शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

नववीच्या वर्गासाठी विद्यार्थी रस्त्यावर ; विनापरवानगी असलेला वर्ग बंद केल्याने पेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 21:41 IST

नाशिकच्या वडळागावातील शाळाक्रमांक ८३ येथे विनापरवानगी सुरू असलेल्या नववीचा वर्ग बंद करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्यानंतर या वर्गात बसणाया विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.९०) भर पावसात रस्त्यावर उतरून आम्ही शिकायचे कसे, असा सवाल करीत महापालिका आयुक्तांना भेटण्याचाा आग्रह धरला. मात्र आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत शिक्षणाधिकारी महाजन यांच्याशी समन्वयातून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला. दरम्यान, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिसरातील शाळेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. 

ठळक मुद्देवडाळायातील नववीचा वर्ग अचानक बंद करण्याच्या सूचना परवानगी नसताना सुरू होता नववीचा वर्ग शाळेतील विद्यार्थ्यांची रस्त्यावर उतरून निदशर्ने

नाशिक : वडळागावातील शाळाक्रमांक ८३ येथे विनापरवानगी सुरू असलेल्या नववीचा वर्ग बंद करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्यानंतर या वर्गात बसणाया विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.९०) भर पावसात रस्त्यावर उतरून आम्ही शिकायचे कसे, असा सवाल करीत महापालिका आयुक्तांना भेटण्याचाा आग्रह धरला. मात्र आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत शिक्षणाधिकारी महाजन यांच्याशी समन्वयातून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला. दरम्यान, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिसरातील शाळेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. नाशिक महानगरपालिकेचे तत्कालिक प्रभारी शिक्षण अधिकारी उदय देवरे यांनी गेल्या वर्षी एका कार्यक्रमात दिलेल्या आश्वासन दिल्याचा दावा करीत वडाळागावातील शाळा क्र. ८३ मध्ये नववीचा वर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु, प्रशासकीय स्तरावर याविषयी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला कोणतीही माहिती दिली नाही. अशा स्थितीत स्थानिक नागरिकांकडून महापालिकेचे शाळेकडे दुर्लक्ष होत असून, शालेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसून शिक्षकही नसल्याची ओरड केल्याने हा प्रकार समोर आला. त्यामुळे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी संबंधित वर्ग तत्काळ बंद करण्याच्या सूचना केल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी गेल्या महिनाभरापासून शाळेत बसणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले. याप्रकारानंतर परिसरातील जमील रंगरेज यांनी संबंधित विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मंगळवारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करीत आयुक्तांच्या भेटीची मागणी केली. मात्र आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अनुपस्थितीत उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी काही विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच महाजन यांच्याशी चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी महाजन यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्याच शाळेत नववीचा वर्ग सुरू करण्याची मागणी केली. मात्र शिक्षणाधिकाºयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित शाळेत शिक्षक व जागेची तरतूद होपर्यंत समायोजन करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र विद्यार्थ्यांसोबत आलेल्या जमिल रंगरेज यांनी आहे सध्या सुरू असेलेल्याच ठिकाणी सध्या सुरू असेल्या स्थितीतच नववीचा वर्ग सुरू ठेवण्याची मागणी कायम ठेवल्याने महालालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा