चोरीचा आरोप सहन न झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्त्या
By Admin | Updated: July 24, 2016 21:54 IST2016-07-24T21:43:25+5:302016-07-24T21:54:03+5:30
चोरीचा आरोप सहन न झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्त्या

चोरीचा आरोप सहन न झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्त्या
पेठ : दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथील शासकीय आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने चोरी केल्याचा आरोप जिव्हारी लागल्याने शाळेच्या परिसरातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुलगी बेपत्ता झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर दोन दिवसापासून शोध सुरू होता. रविवारी विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढून पेठच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. पेठ पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करीत आहेत. (वार्ताहर)