विद्यार्थ्याची आत्महत्त्या

By Admin | Updated: September 22, 2016 22:58 IST2016-09-22T22:57:13+5:302016-09-22T22:58:18+5:30

विद्यार्थ्याची आत्महत्त्या

Student Suicide | विद्यार्थ्याची आत्महत्त्या

विद्यार्थ्याची आत्महत्त्या


पेठ : तालुक्यातील करंजाळी येथील बारावीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
करंजाळी येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या चंद्रशेखर भास्कर निंबेकर (१८) याने गावानजीक असणाऱ्या वनविभागाच्या रोपवाटिकेत फणसाच्या झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे सकाळी वनरक्षक दिनेश चौधरी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पेठ पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्त्येचे कारण समजू शकलेले नाही. (वार्ताहर)
निऱ्हाळे-वावी बस
सुरू झाल्याने समाधान
सिन्नर : आगाराच्या वतीने सिन्नर-निऱ्हाळे-वावी-सिन्नर अशी सकाळची फेरी बस सुरू केल्याने परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
सरपंच प्रकाश दराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सदर बसचा शुभारंभ करण्यात आला. युवराज घोरपडे यांच्या हस्ते चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. या बसमुळे निऱ्हाळे, घोटेवाडी, खंबाळे, मऱ्हळ, सुरेगाव, कुंदेवाडी, मुसळगाव भागातील विद्यार्थी, कामगार व प्रवाशांची सोय झाली आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Student Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.