त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे येथील गजानन महाराज उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षेत एकूण ३६ विद्यार्थ्यांतून चांगले गुण मिळवून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उतीर्ण झालेल्या हिरामण इरते, बाळू इरते, अजय जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच माजी विद्यार्थिनी व सध्या नाशिक येथे खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेली भारती पादी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस.बी. दोंदे होते. सूत्रसंचालन पांडुरंग दोंदे यांनी, प्रास्ताविक जी.जी. पवार यांनी, तर आभार प्रा. एस.बी. वारे यांनी मानले. यावेळी तानाजी नाठे, पांडुरंग नाठे, हिरामण नाठे, केशव बोराडे, शुभम बोराडे, सोनू बोराडे, मोहन बोराडे, प्रमोद ढोंगे, शंकर बोराडे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (२२ देवगाव)
220921\251822nsk_48_22092021_13.jpg
गजानन महाराज विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव