शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

वर्गातील कपाट अंगावर कोसळून विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:37 IST

शहरातील गंगापूररोडवरील एका शाळेत सातवीच्या वर्गात असलेले लोखंडी कपाट अंगावर पडल्याने एक विद्यार्थी ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.३०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक : शहरातील गंगापूररोडवरील एका शाळेत सातवीच्या वर्गात असलेले लोखंडी कपाट अंगावर पडल्याने एक विद्यार्थी ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.३०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दुपारी विद्यार्थ्यांची वरांड्यात तसेच वर्गात जेवण्याच्या तयारीत असतानाच काही मिनिटांत इयत्ता सातवीच्या वर्गात मोठा आवाज झाला. शिक्षकांसह काही विद्यार्थ्यांनी वर्गाच्या दिशेने धाव घेतली असता लोखंडी मोठे कपाट कोसळून त्याखाली जयेश सखाराम अवतार (वय १२, रा. क्रांतिनगर, पंचवटी) हा विद्यार्थी दबला असल्याचे आढळले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लागलीच कपाट बाजूला करून जखमी जयेशला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले; मात्र उपचारापूर्व त्याचा मृत्यू झाला होता.दरम्यान, दुर्घटनेची माहिती समजताच जिल्हा शासकीय रुग्णालयात जयेशच्या कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनी धाव घेतली. सरकारवाडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनिल बागुल, नाहीद शेख, रवींद्र पानसरे आदींनी जाऊन पंचनामा सुरू केला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथकही त्या वर्गात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पुराव्यांची जमवाजमव पथकाकडून करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :SchoolशाळाAccidentअपघातStudentविद्यार्थी