विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

By Admin | Updated: July 5, 2014 00:27 IST2014-07-04T22:07:44+5:302014-07-05T00:27:10+5:30

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

Student health check-up | विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

मनमाड : भालूर येथील जनता विद्यालयात मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचे उद्घाटन मविप्रचे तालुका संचालक दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे
म्हणून शालेय समिती अध्यक्ष विठ्ठलराव अहेर, दिनकर पाटील, रमेश शिंदे, चांगदेव उगले, भाऊसाहेब बरशिले, विलास अहेर हे उपस्थित होते. मुख्याध्यापक वाय. सी. जाधव यांनी शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. पी. एम. शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये मोहिमेचा हेतू विशद केला. एस. व्ही. बोरगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. दहावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. माधव पाटील, डॉ. नीलम अहिरे, डॉ.
देवेंद्र अहिरे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. विद्यार्थ्यांना येणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींबाबत डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिलोरे सर यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Student health check-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.