विद्यार्थिनी आत्महत्त्येप्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 29, 2015 00:05 IST2015-11-29T00:05:12+5:302015-11-29T00:05:37+5:30
विद्यार्थिनी आत्महत्त्येप्रकरणी गुन्हा दाखल

विद्यार्थिनी आत्महत्त्येप्रकरणी गुन्हा दाखल
नाशिक : प्रेमसंबंध प्रस्थापित करून विवाहास नकार दिल्यानेच बहीण सुनंदा भोये हिने आत्महत्त्या केल्याची फिर्याद पेठरोडवरील आदिवासी वसतिगृहातील तिच्या मोठ्या बहिणीने पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे़
या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मंगेश काशीनाथ बत्तासे (२१, रा. राऊ हॉटेल परिसर, मखमलाबाद) विरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ पेठरोडवरील आदिवासी विद्यार्थिनी वसतिगृहात सुनंदा चिंतू भोये (१९, रा़ सुरगाणा) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन शुकवारी (दि़२७) दुपारच्या सुमारास आत्महत्त्या केली़ तत्पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मंगेश बत्तासे याने विवाहास नकार दिल्याने आत्महत्त्या करीत असल्याचे लिहिले होते़ (प्रतिनिधी)