वैनतेय विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:42+5:302021-09-21T04:16:42+5:30
अध्यक्षस्थानी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त वि. दा .व्यवहारे होते. प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर ...

वैनतेय विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा
अध्यक्षस्थानी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त वि. दा .व्यवहारे होते. प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर विश्वस्त रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी, दिलीप वाघवकर, मधुकर राऊत, विश्वास कराड, वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. गोरवे, उपप्राचार्य बी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक एम. एस. माळी, पर्यवेक्षक एन. डी. सिरसाट, मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे, पर्यवेक्षक पल्लवी सानप आदी उपस्थित होते.
उपप्राचार्य बी. आर. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. गणेशोत्सवानिमित्त ज्ञानाचा महोत्सवअंतर्गत घेण्यात आलेल्या संस्कारमाला भाग एक परीक्षा, उत्कृष्ट शब्दांकन अक्षर, गणेश स्तोत्र व श्री गणपती अथर्वशीर्ष पठण पाठांतर स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कागदी बुके बनवणे स्पर्धा, या सर्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच स्वरचित काव्यगायन स्पर्धा, योगासन स्पर्धा यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण प्रबोधिनी अंतर्गत ज्या शिक्षकांनी व्याख्याने दिली, त्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संदीप चकोर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक एन. डी. सिरसाट यांनी आभार मानले.
---------------------------
निफाडच्या वैनतेय विद्यालयात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना वि. दा. व्यवहारे, सोबत व्यासपीठावर रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी, दिलीप वाघवकर, मधुकर राऊत, विश्वास कराड, प्राचार्य एस. पी. गोरवे, उपप्राचार्य बी. आर. सोनवणे आदी. (२० निफाड वैनतेय)
200921\20nsk_32_20092021_13.jpg
२० निफाड वैनतेय