विद्यार्थ्यांचे वर्ग आणि शाळेचे व्यावस्थापन एकाच खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST2021-02-23T04:22:11+5:302021-02-23T04:22:11+5:30

नाशिक : जिल्ह्यातील पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रभाव नाही ...

Student classes and school management in one room | विद्यार्थ्यांचे वर्ग आणि शाळेचे व्यावस्थापन एकाच खोलीत

विद्यार्थ्यांचे वर्ग आणि शाळेचे व्यावस्थापन एकाच खोलीत

नाशिक : जिल्ह्यातील पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रभाव नाही अशा ठिकाणी प्राथमिकचे पहिली ते पाचवीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना पुरेशा वर्ग खोल्या नाहीत, त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांसाठीही स्वतंत्र कक्ष नाहीत. अनेक शाळ‌ांमध्ये एकच वर्गखोली असल्याने वर्गखोली, मुख्याध्यापक कक्ष व शिक्षक कक्ष असे सर्व एकाच खोलीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळेचे विविध साहित्य, दस्तावेज, फर्निचर, एका वर्गखोलीतच कोपऱ्याला ठेवून अध्यापनाचे कार्य करावे लागत असून पुरेशा भौतिक सुविधांअभावी दुर्गम भागातील शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक त्रस्त झाले आहे.

इन्फो-

शाळांमध्ये अडचणींचा डोंगर

जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अद्याप स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. तर काही शाळांच्या आवारात स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. स्वच्छतागृहे असली तरी त्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांकडून स्वच्छतागृहाचा वापर करणे टाळले जात असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दिले जाणारे गणवेश आणि शालेय पाठ्यपुस्तके ठेवण्यासाठीही सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

पेठ सुरगाण्यात सर्वाधिक शाळा

एक वर्ग खोलीच्या शाळांचे प्रमाण पेठ, सुरगाणा, इगतपुरीसारख्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक असून इगतपुरीसारख्या तालुक्यांमध्येही शाळांमध्ये विविध समस्यांचा डोंगर असल्याचे दिसून येते. पेठ व सुरगाणा तालुक्यातील वेवेगळ्या पाड्यांवर काही शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या वर्गांसाठी एक शिक्षक आणि एकच वर्ग शिक्षक असल्याचे दिसून येते.

पॉइंटर

जिल्ह्यातील एकूण शाळा - ३,३२४

पहिलीतील विद्यार्थी - १,१७,०४५

दुसरीतील विद्यार्थी - १,२१,३४२

तिसरीतील विद्यार्थी - १,२०,६१८

चैथीतील विद्यार्थी - १,२३,९३९

Web Title: Student classes and school management in one room