युवतीसोबत बळजबरी विवाह करून ठेवले डांबून

By Admin | Updated: August 21, 2016 01:30 IST2016-08-21T01:29:51+5:302016-08-21T01:30:47+5:30

युवतीसोबत बळजबरी विवाह करून ठेवले डांबून

Stuck with a young woman by forcefully marrying | युवतीसोबत बळजबरी विवाह करून ठेवले डांबून

युवतीसोबत बळजबरी विवाह करून ठेवले डांबून

नाशिक : भावास ठार मारण्याची धमकी देऊन २१ वर्षीय तरुणीचे मनमाड येथून अपहरण केल्यानंतर तिच्यासोबत बळजबरीने विवाह केल्याची घटना उघडकीस आली आहे़ विशेष म्हणजे या तरुणीसा गत तीन महिन्यांपासून घरामध्ये डांबून ठेवण्यात आले होते़ या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून मनमाड येथील संशयित रोहित संजय पवार (रा. रमाबाईनगर, मनमाड) सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, हा गुन्हा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे़
मनमाडमधील जनार्दननगर परिसरातील पीडित तरुणीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रोहित पवार याने १५ मे रोजी तोंड दाबून घरातून अपहरण केले़ यानंतर या तरुणीला नाशिकमध्ये आणून एका मंदिरात तिच्यासोबत बळजबरीने विवाह केला़ तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास वा सांगेल त्याप्रमाणे न वागल्यास तरुणीच्या भावाला जिवे ठार मारण्याची तसेच घर पेटवून देण्याची धमकी संशयित पवारने दिली होती़ यानंतर संशयित पवार याने या तरुणीस १७ मेपासून मनमाड येथील रमाबाईनगरमधील घरामध्ये डांबून ठेवले होते़ १९ आॅगस्टला येथून सुटका करून घेत या युवतीने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो तत्काळ गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर तो मनमाड पोलिसांकडे वर्ग केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Stuck with a young woman by forcefully marrying