शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी उत्पन्न राखून ठेवण्याच्या एसटीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:23 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात आल्याचा प्रसंग एस.टीच्या इतिहासात प्रथमच घडल्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आता आगाराच्या वेतनासाठी दहा दिवसांचे उत्पन्न राखून ठेवण्याचे आणि सदर निधी बॅँकेत ठेवण्याचे आदेश एस.टी. महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात आल्याचा प्रसंग एस.टीच्या इतिहासात प्रथमच घडल्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आता आगाराच्या वेतनासाठी दहा दिवसांचे उत्पन्न राखून ठेवण्याचे आणि सदर निधी बॅँकेत ठेवण्याचे आदेश एस.टी. महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील कर्मचाºयांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन शंभर टक्के न करता पहिल्या टप्प्यात टक्के वेतन अदा करण्यात आले होते. केवळ ८१ टक्के वेतन अदा करण्यात येऊन उर्वरित १९ टक्के वेतन देण्यासंदर्भात निर्णय नंतर कळविण्यात आले होते.यामुळे महामंडळातील कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. अनेक संघटनांनीदेखील महामंडळाच्या आर्थिक तोट्याला महामंडळातील नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. महामंडळातील खासगीकरण धोरणावरही कर्मचाºयांनी टीका केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी चौफेर वादळ उठले होते. कर्मचाºयांच्या वेतनानंतर डेपोतील डिझेलसाठीदेखील पैसे नसल्याने दोन दिवसांपासून बससेवा विस्कळीत झाली, तर अनेक चालक वाहकांना सक्तीची रजा देण्यात आली होती. अजूनही डिझेलबाबतची अनिश्चितता कायम आहे. या सर्व प्रकारानंतर आता महामंडळाने तोडगा काढला असून, डेपो स्तरावरच कर्मचाºयांचे वेतन करण्यासाठी रोजच्या उत्पन्नामधून काही उत्पन्न राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाºयांना वेळेत वेतन मिळावे म्हणून आगारातील दैनंदिन महसूल दरमहा दि.१ ते ४ या कालावधीमध्ये राखून ठेवण्याबात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उत्पन्न राखून ठेवले जात असेल तर उत्पन्नाच्या आगारातील कर्मचाºयांचे वेतन पूर्णपणे अदा होत नसल्यामुळे आता यापुढे आगारातील वेतनासाठी महिन्याच्या २७ आणि २८ तारखेपासून ज्या महिन्यात वेतन अदा करावयाचे आहे त्या महिन्याच्या ६ तारखेपर्यंत कर्मचाºयांच्या वेतनासाठी उत्पन्न बॅँकेमार्फत राखीव ठेवण्यात येऊन महिन्याच्या ७ तारखेला सर्व कर्मचाºयांचे संपूर्ण वेतन आपल्या स्तरावर अदा करण्याच्या सूचना महामंडळाच्या वित्तीय सल्लागार विभागाने दिलेल्या आहेत.तीन दिवसांपासून ‘ड्यूट्या’ रद्दनाशिक विभागात डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे चालक वाहकांच्या ड्यूट्या रद्द करण्यात आल्याची चर्चा असतानाही वाहतूक विभागाने मात्र असा कोणताही प्रकार आणि प्रवाशांच्या तक्रारी नसल्याची भूमिका घेतली आहे. गेल्या तीन दिवसांच्या चालक-वाहक रिपोर्टमध्ये मात्र अनेक कर्मचाºयांच्या ड्यूट्या रद्द केल्याचे तसेच काही कर्मचाºयांची सुटी दाखविण्यात आली आहे. अनेक चालक-वाहक हे ड्यूटीवर असतानाही त्यांची रजा दाखविण्यात आल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. तर प्रवाशांना तक्रारीसाठी तक्रार पुस्तकच नसल्याने प्रवासी तक्रार करणार कुठे?

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक