मातंगवाड्यात पार्किंगच्या वादातून मारहाण

By Admin | Updated: July 10, 2017 17:10 IST2017-07-10T17:10:44+5:302017-07-10T17:10:44+5:30

दुचाकी पार्किंगच्या कारणावरून झालेल्या भांडणात मारहाण तसेच महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्री भद्रकालीतील मातंगवाड्यात घडली़

Struggling with parking promise in Mathangwad | मातंगवाड्यात पार्किंगच्या वादातून मारहाण

मातंगवाड्यात पार्किंगच्या वादातून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दुचाकी पार्किंगच्या कारणावरून झालेल्या भांडणात मारहाण तसेच महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्री भद्रकालीतील मातंगवाड्यात घडली़
भद्रकाली पोलीस ठाण्यात रोहित सुभाष लव्हेरा (२३ रा.मोठा मातंगवाडा भद्रकाली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते मातंगवाडा व्यायामशाळेजवळ दुचाकी पार्क करीत होते़ त्यावेळी संशयित जोगेंद्र डांगळे, योगेश थावरी, संगीता डांगळे व पूजा थावरी (रा.सर्व मातंगवाडा) आदींनी पार्किंगच्या कारणावरून रोहित लव्हेरा यांना शिवीगाळ व मारहाण केली, तर भावाच्या चारचाकी वाहनात पर्स शोधत असताना संशयित सुभाष लव्हेरा याने छेडछाड करून विनयभंग केला़ तसेच महिलेच्या पतीस लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली़
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात मारहाण व विनयभंगाचा असे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

Web Title: Struggling with parking promise in Mathangwad