संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात

By Admin | Updated: April 16, 2017 23:09 IST2017-04-16T23:09:14+5:302017-04-16T23:09:33+5:30

संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात

The struggle journey today in Nashik district | संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात

संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात

नाशिक : विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेचे सोमवारी (दि.१७) नाशिकला आगमन होत आहे. सोमवारी व मंगळवारी ही यात्रा नाशिक जिल्ह्यात फिरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व अन्य प्रश्नांबाबत वार्तालाप व जाहीर सभा होणार आहे. यात्रेत मालेगाव, बागलाण, चांदवड व निफाड या चार तालुक्यांत जाहीर सभा होणार आहे. या संघर्ष यात्रेत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, आरपीआय कवाडे गटाचे प्रा. जोगेंद्र कवाडे सहभागी होणार आहेत.
सोमवारी (दि. १७) १० वाजता मालेगावला मनमाड चौफुलीवर जाहीर सभा, २ वाजता नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती भेट, दुपारी २ वाजता जाहीर सभा, दुपारी ३.३० देवळा पाचकंदील त्रिफुलीवर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
४.३० वडाळीभोई (चांदवड) येथे वार्तालाप. साडेचार वाजता पिंपळगावला जाहीरसभा, सायंकाळी ६ वाजता आडगाव (नाशिक) येथे आगमन व शेतकऱ्यांशी संवाद, मंगळवार (दि.१८) १० वाजता पत्रकार परिषद, देवळाली कॅम्प, भगुरमार्गे पांढुर्ली व शिवडा गावास भेट, २ वाजता घोटी जाहीरसभा व नंतर शहापूरकडे संघर्ष यात्रा रवाना.

Web Title: The struggle journey today in Nashik district