शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

गिरणा मोसम पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 10:40 PM

मालेगाव कॅम्प : शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तर काही रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहरातून ...

ठळक मुद्देमालेगाव । महापालिका प्रशासनाकडून नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव

मालेगाव कॅम्प : शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तर काही रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहरातून वाहणाऱ्या गिरणा, मोसम नद्यांना पूर आला होता. त्यामुळे शहरातील बहुतांश पूल पाण्याखाली गेले होते. परिणामी या पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य दुर्घटना व सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून महापालिकेने पुलांचे (स्ट्रक्चलर आॅडिट) गुणवत्ता तपासणी सुरू केली आहे. मोसम नदीवरील प्रामुख्याने द्याने फरशी पूल व सांडवा पुलाची दुरुस्ती न करता हे दोन्ही पुलाच्या नवीन उंचीचे बांधकाम करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.शहरात सर्वत्र लहान-मोठ्या मुख्य रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. जुजबी दुरुस्तींवर नागरिकांचा रोष आहे तर वेळोवेळी आंदोलन शहरात होत आहे. या सोबत तीन आठवड्यांपूर्वी शहरात नसला तरी धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे समाधानकारक भरली. हरणबारी धरणातून मोसमनदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे या नदीला पूर आला होता. तीन, चार दिवस पूर परिस्थिती सलग होती. तर गेले दोन दिवस या नदीवरील मालेगाव लगतचे वडगाव, द्याने पूल, रामसेतू, सांडवा पूल हे पूरपाण्याखाली गेले होते. पुलाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आमदार आसिफ शेख यांनी सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश केले. अद्याप त्याचा रिपोर्ट येणे बाकी आहे; परंतु द्याने, वडगाव, सामान्य रुग्णालय, अहिल्याबाई होळकर, दोन्ही मोसमपूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल, सांडवा, रामसेतू, घाटावरील नवीन पादचारी पूल, अल्लमा एकबाल पूल या सर्व ९-१० पुलांपैकी द्याने, सांडवा, रामसेतू पुलांचा प्रश्न गंभीर बनला आहे.रामसेतू उंच असल्याने तो दुरुस्त होऊ शकतो; परंतु द्याने व सांडवा पूल दुरुस्त करण्यापेक्षा त्यावर नवीन उंच जादा लांबी-रुंदीचा पूल बनविल्यास सदर पुलांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो असा कयास येथील नगरसेवकांनी बांधला आहे. महापालिकेच्या नवीन दोन प्रस्तावित पुलांमुळे द्याने, सांडवापूल पूरपाण्यामुळे रहदारीस खुला राहू शकतो. तर बारा महिने या पुलांच्या वापरामुळे भाजी बाजार, रामसेतू धान्य बाजार आदी परिसरातील वाहतूक वळवली जाऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे यासाठी लवकरच अधिकृत प्रस्ताव टाकण्यासाठी महापालिका प्रशासन विचाराधिन आहे. शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाºया पुलांची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती महापालिकेच्या बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे.शहरातील पूल बनले धोकादायकमालेगाव : शहरातील सांडवा पूल फार पूर्वीपासून वापरता पूल आहे. प्रत्येक पावसाळ्यात सांडवा बुडतो व नुकसान होते. संरक्षक कठडे नसल्याने असुरक्षितता आहे. हा पूल दुरुस्त करण्याऐवजी त्याची नव्याने उंची वाढवून जादा लांबी रुंदंीचा केल्यास कायमचा प्रश्न मिटणार आहे. महापालिका पदाधिकारी व प्रशासन शहरातील मोसम व गिरणा नदीवर नवीन पूल बांधण्याच्या विचाराधीन आहे. तसेच द्याने पूल दुरुस्त झाला आहे; परंतु त्याची उंची कमी आहे. अगदी थोडे पाणी वाढल्यास पुलावर पाणी साचते तर पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होते. हा पूल मोठ्या उंचीने नवीन बांधकाम केल्यास समस्या कमी होतील व नागरिकांना कुसुंबारोडने मोठा फेरा करावा लागणार नाही, यावर महानगरपालिकेने विचार करावा अशी मागणी द्याने, वडगाव व मोसम काठावरील गावातील नागरिकांनी केली आहे.