शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

भगवान अरिहंत मूर्तीसाठी अखंड शिलेचे जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

मूर्तीची प्रतिष्ठापना श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली यांच्या मूर्तीच्या धर्तीवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कर्नाटकमधील बेंगलोर जवळच्या देवनहळ्ळी ...

मूर्तीची प्रतिष्ठापना श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली यांच्या मूर्तीच्या धर्तीवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कर्नाटकमधील बेंगलोर जवळच्या देवनहळ्ळी येथून हा ३६५ टन वजनाचा क्रिम कलरचा ग्रेनाईट पाषाण १४४ टायरच्या ट्रेलरमधून आणण्यात येत आहे. हैदराबाद सोलापूर, मोहोळ, मोडलिंब, करमाळा, नगर, शिर्डी, येवला, मनमाड, मालेगाव मार्गे शुक्रवारी (दि. ४) दुपारी चांदवड शहरात या महाकाय शिलेचे आगमन झाले.

यावेळी दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र कासलीवाल, उपाध्यक्ष सुभाष अजमेरा, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जव्हारीलाल संकलेचा, ईश्वर बाफना, मांगीलाल कासलीवाल, केशरचंद पाटणी, मोहनलाल अजमेरा, ॲड. राजेंद्र कासलीवाल, राजेंद्र अजमेरा, दर्शन अजमेरा, शांतिलाल कासलीवाल, वर्धमान पांडे, प्रवीण कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, संजय महाजन, योगेश अजमेरा, अल्केश अजमेरा, सुनील डुंगरवाल, पराग कासलीवाल, अंकुर कासलीवाल रूपेश अजमेरा, मोनू कासलीवाल, अनिल महाजन, नीलेश अजमेरा, महेंद्र अजमेरा यांनी सामूहिक शांती मंत्राचे पठण करत महाकाय शिलेस पुष्पहार घालून स्वागत केले. महेंद्र कंकरेज, शरद बोराडे, राजू बिरार यांनीही चांदवडकरांच्यावतीने या शिलेचे स्वागत केले.

कोट.....

देवणहळ्ळीजवळच्या छप्पडकल्ल तलावाच्या पाण्यातून हा पाषाण कोरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी गेला. तेथून मुख्य रस्त्यावर आणण्याकरिता तीन दिवस गेले. चार मोठ्या क्रेनच्या साहाय्याने ही शिला ट्रेलरवर विराजमान करण्यात आली. नऊ जणांचा चमू ही शिला घेऊन निघाल्यापासून शुध्द शाकाहारच घेत आहे. १३०० किलोमीटरचे अंतर ४० दिवसात पार करून ५ जून रोजी सकाळी ७ वाजता ही शिला मालसाने येथे पोहोचणार आहे. ताशी दहा ते बारा किलोमीटरच्या वेगाने दररोज ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत आहोत.

- कुलदीपसिंह, ट्रेलर मालक

फोटो- ०४ मालसाणे महावीर

भगवान अरिहंत यांच्या मूर्तीसाठी लागणाऱ्या ३६५ टन वजनाच्या शिलेचे स्वागत करताना चांदवड येथील भाविक.

===Photopath===

040621\04nsk_31_04062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०४ मालसाणे