शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजी, भाववाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई ; जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 19:54 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत साठेबाजी, दरवाढीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाºयांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी आणि भाववाढ अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देसाठेबाजी, भाववाढीवर प्रशासनाची करडी नजर साठेबाजांवर कठोर कारवाईन करणार जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा इशारा

नाशिक : जीवनावश्यक वस्तू विक्रे त्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत साठेबाजी, दरवाढीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी आणि भाववाढ अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा व व्यवस्थितरीत्या मिळावा तसेच सर्वप्रकारचे दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार सुरळीत रहावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत माहिती आणि मदतीसाठी ‘टीम संकट सोबती’ तयार करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १७ अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याकडे वेगवेगळे विषय देण्यात आले असून, संबंधित अधिकाºयांचे संपर्क क्रमांक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दिले आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांना काही अडचणी येत असतील त्यांनी संबंधित अधिकाºयाला संपर्क केल्यास त्यांच्या अडचणींची सोडवणूक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किराणा  दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये कामासाठी येणारा मजूर हा व्यवस्थित आपल्या कामावर जाईल, यासाठी शहर व ग्रामीण पोलीस प्रशासन यांनीदेखील हेल्पलाइन सुरू केली आहे. किराणा दुकाने व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या कमीत कमी ठेवणे बंधनकारक आहे. दरम्यान, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयSuraj Mandhareसुरज मांढरेShoppingखरेदी