ओढा येथे शेतकऱ्यास मारहाण

By Admin | Updated: February 29, 2016 22:50 IST2016-02-29T22:50:37+5:302016-02-29T22:50:52+5:30

ओढा येथे शेतकऱ्यास मारहाण

Strike the Farmer in Lean | ओढा येथे शेतकऱ्यास मारहाण

ओढा येथे शेतकऱ्यास मारहाण

नाशिक : एका शेतकऱ्याच्या शेतात चौघा संशयितांनी अतिक्रमण करून पिकांच्या नुकसानीबरोबरच मारहाण केल्याची घटना ओढा येथे घडली आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर गोपीनाथ भोर (४४, मु़पो़ ओढा, ह़ मु़ स्वामी समर्थनगर, नाशिकरोड) यांची शेती आहे़ या शेतात संशयित नरहरी लक्ष्मण पेखळे, विठोबा नरहरी पेखळे, त्र्यंबक नरहरी पेखळे व ज्ञानेश्वर नरहरी पेखळे या चौघा भावांनी १३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यान शेतात अतिक्रमण केले़ तसेच शेतातील कांदा, हरभरा, घास, खोंडे या पिकांचे नुकसान केले़ याबाबत भोर यांनी संशयितांना विचारणा केली असता त्यांनी हातपाय तोडण्याची धमकी देत मारहाण केली़

Web Title: Strike the Farmer in Lean