वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यास मारहाण

By Admin | Updated: September 30, 2015 23:23 IST2015-09-30T23:23:08+5:302015-09-30T23:23:41+5:30

वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यास मारहाण

Strike the employee in the traffic branch | वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यास मारहाण

वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यास मारहाण

नाशिक : दुचाकीवर चार सीट जाणाऱ्या युवकांना अडविण्याचा राग येऊन त्यांनी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना मुंबई नाका परिसरात घडली आहे़
किनारा हॉटेलजवळून दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून जाणारे संशयित असिफ शेख, मुन्नावर शेख, अनिस अख्तार, मैनुद्दीन अख्तार (सर्व रा. महाराणा प्रताप चौक, सिडको) या चौघांना कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार ढाकणे यांनी थांबण्यास सांगितले व कागदपत्रांची मागणी केली़ या गोष्टीचा राग येऊन या चौघांनी ढाकणे यांची गच्ची पकडून मारहाण केली. या चौघांनी वाहनाची कागदपत्रे न बाळगता, दारू पिऊन चार सीट गाडी चालवत होते. चौघा संशयितांवर भद्रकाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Strike the employee in the traffic branch