शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:44 IST

मुबलक पाणीसाठा असताना केवळ पाणीपुरवठा विभागातील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या श्रेयवादावरून राणेनगर भागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर भागासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही.

सिडको : मुबलक पाणीसाठा असताना केवळ पाणीपुरवठा विभागातील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या श्रेयवादावरून राणेनगर भागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर भागासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही.महापालिकेला वारंवार सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गेल्या रविवारी (दि.२) संतप्त नागरिकांनी व्हॉल्वमनला घेराव घातला. परंतु यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने सोमवारी शिवसेनेचे नीलेश सोळुंखे व बाळासोहब काळे यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छानगर भागातील महिला व नागरिकांनी थेट मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत पाणीपुरवठा अधिकारी दौलत घुले यांच्या दालनात ठिय्या मांडत जोपर्यंत पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथून जायचेच नाही, असा पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यानंतर मोर्चेकºयांनी पाणीप्रश्न सुटावा यासाठी सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांच्या दालनात जाऊन मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना निवेदन दिले. यावेळी उपस्थित महिला व नागरिकांनी पाणीपुरवठा अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे सदिच्छानगर भागातील पाणीप्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप केला. यावेळी सुधाकर बडगुजर यांनी पाणीपुरवठा अधिकारी दौलत घुले, कनिष्ठ अभियंता गोकुळ पगारे तसेच व्हॉल्वमन यांना बोलावून घेत सदिच्छानगरचा पाणीप्रश्न त्वरित सुरळीत करण्याचे सांगितले. तसेच पाणीप्रश्न सुरळीत न झाल्यास महिला व नागरिकांना बरोबर घेत आंदोलन करण्याचा इशाराही दिला. यावेळी नीलेश साळुंखे, बाळासाहेब काळे, वंदना काळे, जयश्री गावडे, योगीता गावडे, छाया काकड, सुगंधा भोये, रेणुका गाडेकर, सुमन भिसे, संध्या ठाकरे, रुपाली मोरे, सरस्वती मोरे, उषा पाटील, सुलोचना पाटील, नंदा गायकवाड, अनिता वाजे आदी उपस्थित होते.अधिकाºयांचा नियोजनशून्य कारभारएकीकडे सिडको भागात मुबलक पाणीपुरवठा होत असून, नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते तर दुसरीकडे सदिच्छानगर भागातील रहिवाशांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना दिवस-रात्र एक करावा लागत असून, त्या ठिकाणी पाणीच नाही. परंतु सिडकोसह परिसरात मुबलक पाणीपुरवठा होत असताना केवळ मनपाच्या पाणीपुरवठा अधिकाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे सदिच्छानगर भागात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.सिडको प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर भागासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून येथील रहिवाशांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने महिलावर्गात मनपाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराबाबत तीव्र संताप परसला आहे.सिडकोतील काही भागाला तसेच सदिच्छानगर भागात शिवाजीनगर तसेच मुकणे येथून पाणीपुरवठा केला जात असून, पाणीसाठा मुबलक असताना केवळ कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण व शिवाजी चव्हाणके या दोघांमधील कामकाजाच्या श्रेयवादावरून सदिच्छानगरसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. पाणीप्रश्न सुरळीत करण्यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेणार आहे.  - सुधाकर बडगुजर,  मनपा विरोधी पक्षनेते

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीWomenमहिला