लाचखोर हवालदारास सक्तमजुरीची शिक्षा
By Admin | Updated: July 31, 2016 01:01 IST2016-07-31T01:00:28+5:302016-07-31T01:01:26+5:30
लाचखोर हवालदारास सक्तमजुरीची शिक्षा

लाचखोर हवालदारास सक्तमजुरीची शिक्षा
नाशिक : तक्रारदाराकडून कारवाई न करण्याप्रकरणी दीड हजाराची लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या पोलीस हवालदार शिवाजी कचरू सानप यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्षे सक्तमजुरी व दंड ठोठावला आहे.
महिलेविरोधात कारवाई न करण्याप्रकरणी तक्रारदार आशा जाधव यांनी हवालदार सानप यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ७ जानेवारी २०१० साली सानप यास रंगेहाथ पकडले होते.
सानप याने गंगापूर गाव येथे जाधव यांच्याकडून लाच स्वीकारली. त्यानुसार विभागाने सापळा रचून सानपला अटक केली. याप्रकरणी सानप विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या न्यायालयात याप्रकरणी खटला सुरू होता.
सहायक सरकारी पक्षातर्फे के. एन. निंबाळकर यांनी युक्तिवाद केला. सानप विरोधात ठोस पुरावे मिळाल्याने न्यायालयाने त्यास एक वर्षे सक्तमजुरी आणि दीड हजारांचा दंड ठोठावला आहे. (प्रतिनिधी)