अत्याचार करणाऱ्यास सक्त मजुरी

By Admin | Updated: May 5, 2016 00:20 IST2016-05-05T00:02:24+5:302016-05-05T00:20:27+5:30

अत्याचार करणाऱ्यास सक्त मजुरी

Strict labor to the oppressor | अत्याचार करणाऱ्यास सक्त मजुरी

अत्याचार करणाऱ्यास सक्त मजुरी

 नाशिक : कुरकुरे देण्याचे आमिष दाखवून सातवर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी विकी रतन चौधरी (रा़ हिरावाडी, पंचवटी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांनी बुधवारी (दि़ ४) दहा वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ २०१४ मध्ये पंचवटीत ही घटना घडली होती़
पंचवटी परिसरातील एका सात वर्षीय मुलीस आरोपी विकी चौधरी याने २४ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुरकुरे देण्याचे तसेच वडिलांकडे घेऊन जाण्याचे आमिष दाखवून हिरावाडीतील भिकुसा पेपर मिल परिसरात घेऊन गेला़ या ठिकाणी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला़ ही बाब पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर मुलीच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी विकी चौधरी याच्यावर बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता़
जिल्हा न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील अ‍ॅड़ सुनीता साळवे व दीपशिखा भिडे-भांड यांनी सहा साक्षीदार तपासून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर केले़ या पुराव्यानुसार न्यायाधीश ऊर्मिला जोशी यांनी आरोपी विकी चौधरी यास १० वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी २ वर्षे सक्तमजुरीचे आदेश दिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Strict labor to the oppressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.