धक्का देऊन वृद्धेचे मंगळसूत्र खेचले
By Admin | Updated: August 27, 2016 22:31 IST2016-08-27T22:31:36+5:302016-08-27T22:31:49+5:30
धक्का देऊन वृद्धेचे मंगळसूत्र खेचले

धक्का देऊन वृद्धेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक : मॉर्निंग वॉक करून घराकडे परतणाऱ्या वृद्धेस धक्का देऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी खेचून नेल्याची घटना सिडकोतील गोविंंदनगर परिसरात शुक्रवारी (दि़२६) सकाळच्या सुमारास घडली़
सद्गुरूनगरमधील मयुरेश रेसिडेन्सीमधील रहिवासी कमल दगडू कोतवाल (६६) या सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या़ सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास त्या घरी परतत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एका संशयिताने त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ याप्रकरणी कोतवाल यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)