शहर परिसरात तणावपूर्ण शांतता

By Admin | Updated: June 9, 2014 00:19 IST2014-06-09T00:12:37+5:302014-06-09T00:19:48+5:30

नाशिक : शहरात काल रात्रीपासून महापुरुषांच्या बदनामीकारक मजकुराची अफवा पसरल्यानंतर शहरात आज तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Stressful peace in the city area | शहर परिसरात तणावपूर्ण शांतता

शहर परिसरात तणावपूर्ण शांतता

 

 

नाशिक : शहरात काल रात्रीपासून महापुरुषांच्या बदनामीकारक मजकुराची अफवा पसरल्यानंतर शहरात आज सकाळच्या सुमारास काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलीस आणि सामाजिक नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर वाद निवळला. सकाळच्या सुमारास द्वारका चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर वडाळ नाका परिसरात एका बसची काच फोडण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, सकाळपासूनच पोलिसांनी संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करून राजकीय नेत्यांशी चर्चा केली. (प्रतिनिधी)

Web Title: Stressful peace in the city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.