शुभेच्छा फलक पेटविल्याने तणाव
By Admin | Updated: November 10, 2015 22:24 IST2015-11-10T22:23:00+5:302015-11-10T22:24:17+5:30
शुभेच्छा फलक पेटविल्याने तणाव

शुभेच्छा फलक पेटविल्याने तणाव
पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण येथील शिवसैनिकांनी गावात लावलेला दीपावली शुभेच्छा फलक सोमवारी रात्री ज्ञात समाजकंटकाने पेटविल्याने कळवण तालुक्यातील शिवसैनिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कळवण पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवण पोलिसांना शिवसेना तालुकाध्यक्ष जितेंद्र वाघ यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह संबंधित समाजकंटकाविरोधात तक्रार निवेदन दिले असून, भादवण येथील काकाजी जाधव, गौतम जाधव, पंकज जाधव, मनोहर जाधव, सागर जाधव, रोषण जाधव, प्रवीण जाधव, दिनेश जाधव यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्याने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
उसनवारी पैसे न दिल्याने तरुणावर हल्ला
ंमालेगाव : येथील नवीन बसस्थानकाजवळ लाकूडतोड कामगाराने उसने पैसे न दिल्याने त्याच्या पोटात चाकू खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहबान कालिया (पूर्ण नाव माहीत नाही) रा. मर्चंटनगर याच्या विरोधात आयशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शेख खालीद शेख सिराज (२८) रा. अब्दुल खालीदनगर याने पोलिसांत तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता सदर प्रकार घडला. शाहबान फरार झाला असून उपनिरीक्षक एस. जी. मांडवकर तपास करीत आहेत.