भ्रष्टाचार मुक्त मालेगाव संघटनेचा ठिय्या
By Admin | Updated: August 30, 2016 00:38 IST2016-08-29T22:49:06+5:302016-08-30T00:38:49+5:30
आझादनगर : कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक; गुन्हे दाखल

भ्रष्टाचार मुक्त मालेगाव संघटनेचा ठिय्या
आझादनगर : मालेगाव शहरातील रस्ते व गटारींची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी भ्रष्टाचारमुक्त मालेगाव संघटनेचे अन्सारी रिजवान यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर सरकारी दवाखान्यासमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आझादनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांना अटक करून घेतली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या भागातील शौचालयांची स्वच्छता करण्यात येत नाही. त्याचा अप्रत्यक्ष फायदा येथील पे अॅण्ड यूज पद्धतीच्या शौचालयाच्या ठेकेदारास होतो. शिवाय स्वच्छतेअभावी या गटारीचे पाणी रस्त्यावर जमा होते. त्यामुळे येथे नमाजसाठी येणाऱ्यांना मानसिक त्रास होतो. म्हणून समस्यांचे निवारण करून कामाची चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र मनपास दिले आहे. परंतु त्याची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज ठिय्या देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक मसुद खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजली राजपूत यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली. (वार्ताहर)