शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

देशाच्या अवकाश संरक्षण सिद्धतेला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:00 AM

भारताने उपरोधक शस्त्र म्हणजेच ए सॅट लाइव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्याने भारताला अवकाश संशोधन संस्थेला मोठे ऐतिहासिक यश मिळाले आहे.

एक्सपर्ट व्ह्यूभारताने उपरोधक शस्त्र म्हणजेच ए सॅट लाइव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्याने भारताला अवकाश संशोधन संस्थेला मोठे ऐतिहासिक यश मिळाले आहे. आपण एअर स्ट्राइक करू शकतो हे जगाने बघितले आहे, परंतु त्यापलीकडे जाऊन अवकाश क्षेत्रातदेखील संरक्षणासाठी आपण सज्ज झालो आहेत. ही मोठी उपलब्धी भारताच्या दृष्टीने आहे. विशेषत: सद्य स्थितीत शेजारील राष्टशी सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हे खूप सूचक आणि मोठे यश आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतानेच ही क्षमता सिद्ध केले आहे.बदलत्या काळात युद्धाचे तंत्र बदलू लागले आहे. त्यासाठी वापरली जाणारी माध्यमेदेखील बदलली जात आहे. अवकाशातील संरक्षण हेदेखील आता काळाची गरज बनली आहे. इस्त्रो आणि डीआरडीओ या यंत्रणांनी या संदर्भातील मोठी कामगिरी केल्याने ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. भारताने मिसाइलच्या सहाय्याने अवकाशात असलेला कमी उंचीवर असलेला उपग्रह (लो आर्बिट) पाडल्याने असा उपग्रह क्षेपणास्त्राने पाठविण्याचे तंत्र आपण साध्य केले आहे. सध्या तणावाच्या स्थितीमुळे अनेकांना हा विषय समजला नाही. नक्की कोणाचा उपग्रह पाडला किंवा भारताला उपद्रव देणाऱ्या एका राष्टशी संबंधित हा विषय आहे काय अशी चर्चा यातून सुरू झाली. मुळात असा कोणताही प्रकार नाही. प्रात्यक्षिक करण्यासाठी भारतानेच एक उपग्रह अवकाशात सोडला होता आणि तोच पाडला आहे. त्यामुळे भारताचे फार मोठे नुकसान झाले असेही नाही. कारण तो अवकाशात कमी उंचीवर होता.भविष्यात अशाप्रकारचा एखादा उपग्रह भारतीय संरक्षणाला बाधक अशाप्रकारचे कृत्य करीत असेल हेरगिरी किंवा छायाचित्र घेण्याचे काम भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक असल्यास भारत त्याला पाडू शकतो ही मारक क्षमता यातून जोखली गेली आहे. हे करताना भारताने युनोच्या स्पेस लॉचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. म्हणजेच अन्य देशांना नुकसान होईल किंवा त्यांच्या उपग्रहांची हानी होईल अशाप्रकारची कृती भारताने केलेली नाही.मुळातच भारतात विक्रम साराभाई यांच्यासारख्या धुरिणींनी इस्त्रो स्थापन करतानाच अंतराळ कार्यक्रम हा विधायक कार्य म्हणजेच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असले अशीच भूमिका घेतली होती. युनोचीदेखील तीच भूमिका आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून झटणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी आज मैलाचा दगड ठरेल, अशी कामगिरी केली असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.दळणवळणासह विविध उपयुक्ततादेशहिताच्या दृष्टिकोनातून तसेच दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे उपग्रह भारतासह अनेक देश अंतराळात सोडतात. भारताने उपग्रह सोडल्यानंतर त्याचा दळणवळण, हवामान, शेती, मासेमारी करणारे यांच्यासह अन्य मानवी जीवनाच्या उपयुक्ततेसाठी सोडत असतो. संरक्षणदृष्ट्या अशाप्रकारचे अनेक उपग्रह भारत सोडत असतोच आताही  १ एप्रिल रोजी उपग्रह सोडले जाणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानscienceविज्ञान