मालेगावातील रस्त्यांना लागलेय खड्ड्यांचे ग्रहण

By Admin | Updated: September 10, 2016 00:21 IST2016-09-10T00:21:40+5:302016-09-10T00:21:53+5:30

मागणी : गणेश विसर्जनापूर्वी रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा

The streets of Malegaon, eclipsed by the potholes | मालेगावातील रस्त्यांना लागलेय खड्ड्यांचे ग्रहण

मालेगावातील रस्त्यांना लागलेय खड्ड्यांचे ग्रहण

मालेगाव कॅम्पातील रस्त्यांवर पडलेले खड्डे. दुसऱ्या छायाचित्रात वाहनचालकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत.मालेगाव : गणेश प्रतिष्ठापना होऊन आठवडा उलटला असला तरी शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा ‘फार्स’ मनपाकडून करण्यात येत असल्याची तक्रार आहे.
मालेगाव न्यायालयाच्या इमारतीपासून कॅम्पातील मोची कॉर्नरपर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. आयकर कार्यालयाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, गणेश विसर्जनापूर्वी खड्डा बुजविण्यात यावा. सदर खड्ड्यांमुळे रोजच अपघात होत आहेत.
कॉलेज स्टॉप ते रावळगाव नाका, देवी मंदिर, सावंत हॉस्पिटलजवळ, हिमंतराव देसाई मार्ग, शिवाजीरोड, सावरकर पथ या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. सोयगाव मार्केट, साठफुटी रस्ता, रावळगाव नाक्यापासून जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डे आहे. नागरिकांना खड्ड्यांच्या रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. महापालिकेने रस्त्यांची ‘मलमपट्टी’ करताना हॉटमिक्स पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कॅम्पातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The streets of Malegaon, eclipsed by the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.