पिकअपच्या धडकेत अनोळखी इसम ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:22+5:302021-09-21T04:16:22+5:30
पेठ - गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील बोरवठ फाट्यानजीकच्या पुलावर पिकअपने दिलेल्या धडकेत अनोळखी इसम जागीच ...

पिकअपच्या धडकेत अनोळखी इसम ठार
पेठ - गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील बोरवठ फाट्यानजीकच्या पुलावर पिकअपने दिलेल्या धडकेत अनोळखी इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली. सदर इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन पेठ पोलीसांनी केले आहे. रविवार (दि.१९) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिकहून गुजरातकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपने रस्त्याने सरकत जाणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीला धडक दिल्याने सदर व्यक्ती जागीच ठार झाला. मृत इसमाचे दोन्ही पाय अधू असून वय अंदाजे ६५ ते ७० वर्ष, डोक्याचे केस पांढरे, पाठीवर पांढरा डाग, अंगात तपकिरी रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट अशा वर्णनाचा इसम ओळखीचा असल्यास पेठ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.