कसबे सुकेणे : मध्य रेल्वे मार्गावरील कसबे सुकेणे रेल्वेस्थानकाजवळ गीतांजली एक्सप्रेस या धावत्या रेल्वेगाडीतून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यु झाला आहे.सदरच्या इसमाच्या छातीस डोक्यात, पोटास जबर मार लागून जखमी झाला होता. त्यास अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. त्याचे वय ३८ च्या आसपास असून वर्ण काळा सावळा, उंची पाच फूटट दोन इंच, सडपातळ बांधा असे त्याचे वर्णन आहे.
रेल्वेगाडीतून पडून अनोळखीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:08 IST