शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

किन्नराच्या एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:00 IST

असे म्हणतात की,   लग्नाच्या  रेशीम गाठी या  स्वर्गात बांधल्या जातात... अशाच जुळून आलेल्या आगळ्या वेगळ्या  रेशीम गाठीची  मनमाड  शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. एका अर्थाने या सोहळ्याला क्रांतिकारी विवाह सोहळा म्हणावा लागेल.   हा एक पुरुषाने एका स्त्रीशी केलेला विवाह नव्हे तर ही आहे एका पुरुषाने एका तृतीय पंथीय अर्थात किन्नराशी घेतलेल्या सात फेऱ्यांची  कहाणी आहे. 

ठळक मुद्देपरंपरा झुगारून घेतला क्रांतिकारी निर्णय

मनमाड :  असे म्हणतात की,   लग्नाच्या  रेशीम गाठी या  स्वर्गात बांधल्या जातात... अशाच जुळून आलेल्या आगळ्या वेगळ्या  रेशीम गाठीची  मनमाड  शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. एका अर्थाने या सोहळ्याला क्रांतिकारी विवाह सोहळा म्हणावा लागेल.   हा एक पुरुषाने एका स्त्रीशी केलेला विवाह नव्हे तर ही आहे एका पुरुषाने एका तृतीय पंथीय अर्थात किन्नराशी घेतलेल्या सात फेऱ्यांची  कहाणी आहे. रूढी-परंपरांचे सामाजिक बंधने झुगारून एका तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या किन्नराच्या गळ्यात सर्वांच्या  साक्षीने वरमाला घालून मंगळसूत्र बांधले आहे. हा आगळावेगळा विवाह सध्या सर्वत्र  चर्चेचा विषय ठरला आहे. मनमाड शहरातील किन्नरांच्या महंत शिवलक्ष्मी आणि येवला तालुक्यातील तरुण संजय झाल्टे यांची टिकटॉकच्या माध्यमातून ओळख झाली. नकळत या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. मात्र, समाज आणि लोक काय म्हणतील, असा विचार  दोघांच्याही मनात आला असला तरी प्रेमाच्या ताकदीपुढे हा विचार  टिकाव धरू शकला नाही. अखेर दोघे विवाहबंधनात अडकले ते आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी. दोघांच्याही परिवाराने दिली संमती दोघांनी आपापल्या परीने प्रयत्न करून घरच्या लोकांना पटवून दिले की, ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यांचे  एकमेकांवरील प्रेम पाहून अखेर दोघांच्या परिवारातील सदस्यांनी लग्नाला होकार दिला. त्यानंतर महंत शिवलक्ष्मी व  संजय झाल्टे या दोघांचा मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिरात लग्नसोहळा पार पडला. यावेळी दोघांच्या घरातील काही मंडळी आणि मोजके मित्र उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्न