शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

सिंधी बांधवांच्या चालिहाव्रताची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:28 IST

सिंधी समाजातील महत्त्वाचे मानले जाणारे व गेले चाळीस दिवस आचरण केलेल्या पूज्य चालिहा साहिब जो मेलो या व्रताची मंगळवारी सांगता करण्यात आली.

देवळाली कॅम्प : सिंधी समाजातील महत्त्वाचे मानले जाणारे व गेले चाळीस दिवस आचरण केलेल्या पूज्य चालिहा साहिब जो मेलो या व्रताची मंगळवारी सांगता करण्यात आली. ‘भगवान झुलेलाल’ यांच्या नावाचा जयघोष करीत संसरीच्या दारणा नदीपात्रात पवित्र बहराणा ज्योत व मटकीचे विसर्जन धार्मिक वातावरणात करण्यात आले.दरम्यान, ४० दिवस व्रत करणाऱ्या सिंधी बांधवांनी हातात बांधलेले रक्षासूत्र व गळ्यात घातलेले जान्हवे पुजारी घनश्याम महाराज शर्मा यांनी विधियुक्त मार्गाने काढीत व्रतस्थ असलेल्या भाविकांना व्रताच्या आचरणातून मुक्त करीत असल्याचा आशीर्वाद दिला. पूज्य दयार्शाह संगत ट्रस्टच्या वतीने सकाळी १० ते ४ वाजेदरम्यान व्रताचे उर्वरित विधी-भजन पार पडले. यावेळी देवळालीच्या झुलेलाल मंदिरापासून हौसन रोड, लाम रोडमार्गे संसरी लेनमधून दारणा नदी तटापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत सिंधी समाजाच्या महिलांनी टिपरीवर फेर धरला. भगवान झुलेलाल यांची आरती, अक्खा पावन मंत्र, पल्लव असे विधी केल्यानंतर व्रताची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आल्यावर उपस्थितांनी ‘आयोलाल-झुलेलाल’ व ‘जेको चंवदो झुलेलाल तहिंजा थिंदा बेडा पार’ चा जयघोष केला. सायंकाळी मंदिर परिसरात अध्यक्ष वासुदेव श्रॉफ यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत आनंद कुकरेजा, वासुदेव बत्रा, अमित रोहेरा, नगरसेवक भगवान कटारिया, सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला, मोहन सचदेव, जयप्रकाश चावला आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे