घोटी करांनी अनुभवला नारदभेटीचा प्रसंग
By Admin | Updated: November 27, 2015 22:58 IST2015-11-27T22:54:58+5:302015-11-27T22:58:32+5:30
गिरीबापू यांचे शिवपुराण : नवरात्रानंतर रंगला दांडिया

घोटी करांनी अनुभवला नारदभेटीचा प्रसंग
घोटी : येथे आयोजित श्री शिवपुराण ज्ञानयज्ञात आज दुसऱ्या दिवशी शंकर, विष्णू, ब्रह्मा यांच्या नारदभेटीचा प्रसंग सादर केला. गिरी बापू यांच्या सुमधुर वाणीने व कथेने श्रोते मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण मंडप या कथेच्या श्रवणात तल्लीन झाला होता.
नारद यांना देवर्षी अशी संज्ञा असून, ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. अभिमान हा वाईट असून, त्याचे दुष्परिणाम वाईटच होतात. एके दिवशी देवर्षी नारद एका नगरातून जात असतात. तेव्हा ते नगरातील लोकांना मी किती मोठा आहे हे सांगत असतात. नगरातील लोक मात्र त्यांना सांगतात, आपला चेहरा बघा आधी, तो मर्कटासारखा आहे. हे ऐकून एका जलाशयात स्वत:चे प्रतिंबिब बघून नारदांना आश्चर्य वाटते.
अभिमानामुळे स्वत:चा चेहरा विद्रूप झाला असल्याचे त्यांना उमगते. ते तसेच शंकरजींना जाऊन भेटतात. शंकरजी विष्णूंकडे पाठवतात. तेव्हा भगवान विष्णू त्यांना चार पर्याय देतात. प्रथम तिलक, दुसरा रुद्राक्ष, तिसरा ओम नमो शिवायचा जाप आणि चौथा व मुख्य शिवकथा श्रवण. या शिवकथेचे कथन कोण करणार असा प्रश्न नारदांनी विचारला असता, आपले पिता ब्रह्माकडून कथा श्रवण करावयास सांगतात. नारद वडिलांकडे गेले. ब्रह्मांनी नारद यांना शिवकथा सांगावयास सुरुवात केली. हा प्रसंग गिरी बापूंनी आपल्या मधुरवाणीने असा प्रकट केला की, श्रोते मंत्रमुग्ध झाले.
शंकर, विष्णू, ब्रह्मा यांना नारदभेटीचे प्रसंग गिरीबापू यांनी हिंदी आणि गुजराथी भाषेतून ऐकविला. सायंकाळी दांडिया रास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नाशिक येथून काही मंडळ दाखल झाले होते. (वार्ताहर)