शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कादवाच्या गळीत हंगामाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:47 IST

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली असून, यंदा तीन लाख मे.टन ऊस गाळप होऊन विक्रमी साखर उतारा मिळवून ३,६५,९०० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे, अशी माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली असून, यंदा तीन लाख मे.टन ऊस गाळप होऊन विक्रमी साखर उतारा मिळवून ३,६५,९०० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे, अशी माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.कादवा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा पुरेसा ऊस नसतानाही योग्य नियोजन करीत तीन लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. कमी दिवसात अधिक गाळप करणे व चांगला साखर उतारा मिळावा यासाठी कादवा व्यवस्थापनाने आधुनिकीकरणाची वाट धरत मशिनरी दुरु स्ती करताना त्या आधुनिक व अधिक क्षमतेच्या बसविल्या होत्या. त्यामुळे यंदा कमी दिवसांत जास्त गाळप करणे शक्य झाले तसेच जास्तीचा साखर उतारा मिळविला आहे तो कारखान्याचा इतिहासात सर्वाधिक आहे या हंगामात १६२ दिवसांत ३,००,२०५ गाळप झाले असून १२.१९ विक्रमी साखर उतारा मिळत ३,६५,९०० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.हंगाम सांगताप्रसंगी ऊसतोड कामगारांनी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाळासाहेब उगले, चीफ इंजिनिअर विजय खालकर, चीफ केमिस्ट सतीश भामरे, चीफ अकाउंटंट जे.एल. शिंदे, शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ, युनियन अध्यक्ष सुनील कावळे आदींसह कामगार उपस्थित होते.यंदा अधिक साखर उतारा मिळाल्याने पुढील वर्षी उसाला या वर्षीच्या एफ.आर.पी. पेक्षा अधिक भाव मिळणार असून, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी. हंगाम यशस्वीतेसाठी सर्व ऊस उत्पादक, सभासद, अधिकारी, कामगार, ऊसतोड मुकादम, कामगार, वाहतूकदार, यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. पुढील हंगामापर्यंत नव्याने मिल व टर्बाइन सुरू करण्याचा प्रयत्न असून कमी दिवसांत जास्तीचे गाळप करण्याचे प्रयत्न आहे.- श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक