शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

एचपीटीतील अभिरूप संसदेत सीएए, एनआरसी, एनपीआर विषयांवर वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 22:43 IST

एचपीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या विषयांवर संसदीय पद्धतीने चर्चा केली.

ठळक मुद्देएचपीटीतील अभिरूप संसदेत सीएए, एनआरसी वर चर्चाराज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा चर्चेत सहभाग

नाशिक : नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या विषयांवर संसदीय पद्धतीने एचपीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण व आक्रमक पद्धतीने त्यांची मते मांडल्याने या महाविद्यालयीन उपक्रमात संसदीय चर्चेचीच अनुभूती उपस्थितांना मिळाली. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण संस्था (विधान भवन, मुंबई), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विकास मंडळ आणि एचपीटी आटर््स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालय यांच्यातर्फे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या टी. ए. कुलकर्णी हॉलमध्ये संयुक्तरीत्या आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र विधानसभा सचिव राजेंद्र भागवत, विधी व न्याय विभाग सहसचिव भूपेंद्र गुरव, विधान परिषद सभापतींचे विशेष कार्य. अधिकारी नंदलाल काळे, महाराष्ट्र विधानसभेचे उपसचिव विलास आठवले, वि. स. पागे संस्थेचे संचालक नीलेश मदाने, विधानसभेचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र संख्ये, उपप्राचार्य डॉ. वृंदा भार्गवे आदी उपस्थित होते. ‘संसदीय अभ्यास वर्ग’ कार्यशाळेचे शनिवारी  अभिरूप संसद कार्यक्रमाने उद्घाटन झाले. राज्यशास्त्र विभागाच्या २१ विद्यार्थ्यांनी संसदेत विधेयक मांडण्याची प्रक्रिया सादर केली. अभिरूप संसदेत वादग्रस्त ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक’ अध्यक्षांनी सरकार पक्षाच्या बाजूने टाकलेल्या निर्णायक मताने मंजूर झाले. तत्पूर्वी या विधेयकावरील चर्चेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आपापल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले.अभिरूप लोकसभेत अध्यक्षाची भूमिका विकास प्रसाद याने भूषविली. तर पंतप्रधान म्हणून सिध्दी भंडारीने विधेयकाचे जोरदार समर्थन केले. सुमित गौली याने विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत विधेयकातील तरतुदींवर जोरदार आक्षेप नोंदवत या कायद्याला विरोध केला. श्याम देशपांडे याने मंत्री म्हणून सरकारची बाजू मांडली. मिताली तिवाटणे हिने विरोधी मत मांडले. लोकसभेतील पध्दतीप्रमाणे महासचिव, अतिरिक्त सचिव आणि लघुलेखनिक म्हणून अथर्व घोरपडे, सोनाली गोसावी आणि श्लोक सानप यांनी चोख भूमिका बजावली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, डॉ. प्रशांत देशपांडे यांनी आभार मानले.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीParliamentसंसद