गडगडाटी हास्याचे तुफान ‘यदा कदाचित’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST2021-03-18T04:14:40+5:302021-03-18T04:14:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अडीच दशकाहून अधिक काळ रंगभूमीवर हास्याची कारंजी उसळविणारे तुफान विनोदी नाटक ‘यदा कदाचित’ नाटकाच्या ...

A storm of thunderous laughter ‘maybe’! | गडगडाटी हास्याचे तुफान ‘यदा कदाचित’!

गडगडाटी हास्याचे तुफान ‘यदा कदाचित’!

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : अडीच दशकाहून अधिक काळ रंगभूमीवर हास्याची कारंजी उसळविणारे तुफान विनोदी नाटक ‘यदा कदाचित’ नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन रविवारी (दि. २१) कालिदास कलामंदिरात सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे.

या नाटकासाठी सेमी प्रिव्हिलेज कार्डधारक आणि स्मार्ट कार्डधारक तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी एका कार्डवर दोन तिकिटे आणि प्रत्येकी केवळ १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच तिकिटावरच चितळे एक्स्प्रेसचे ७५ रुपयांचे मोफत खरेदी कुपन नागरिकांना मिळणार आहे. त्यावर २१ तारखेपासूनच वस्तू मिळू शकणार आहेत. नाटकाची तिकिटे लोकमत शहर कार्यालय, शरणपूर रोड तसेच लोकमत अंबड कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहेत.

इन्फो

कोरोना नियमांच्या पालनासह प्रयोग निश्चित

कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून कालिदास कलामंदिरात २१ मार्चला हा प्रयोग निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे सेमी प्रिव्हिलेज कार्डधारक आणि स्मार्ट कार्डधारकांसह कुटुंबीयांनी या विनोदी नाटकाचे बुकिंग लवकरात लवकर करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोगो

सेमी प्रिव्हिलेज कार्डचा लोगो वापरावा. (१७ सेमी प्रिव्हिलेज कार्ड)

---------------

सूचना

पेस्टिंग आज (दि.१७) आवश्यक.

Web Title: A storm of thunderous laughter ‘maybe’!