वादळाने पडझड
By Admin | Updated: May 17, 2017 00:25 IST2017-05-17T00:24:42+5:302017-05-17T00:25:23+5:30
वादळाने पडझड

वादळाने पडझड
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे शनिवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार वादळ होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. या पडझडीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
शनिवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने ग्रामीण भागात हजेरी लावली. कडकडाट करीत कोसळलेल्या विजेमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दोघे जखमी झाले. नाशिक तालुक्यातील देवरगार येथील कैलास विष्णू मोंढे हा वीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे येथील पुंडलिक लक्ष्मण हसन हेदेखील वीज पडून जखमी झाले. मौजे नांदगाव कोहळी येथे वादळी वाऱ्याने पाच घरांचे पत्रे व झाप उडून गेले.