शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

करणी सेनेचे आंदोलन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:10 AM

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी करणी सेना व हिंदुत्ववादी संघटनांकडून नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात करण्यात येणारे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. ‘नही चलेगी, नही चलेगी पद्मावत नही चलेगी’, ‘भन्साळी मुर्दाबाद’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी गंगापूर धरणाकडे धाव घेतली; परंतु अगोदरच प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कार्यकर्त्यांना धरणाच्या प्रवेशद्वारावरच ताब्यात घेण्यात आले.

नाशिक : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी करणी सेना व हिंदुत्ववादी संघटनांकडून नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात करण्यात येणारे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. ‘नही चलेगी, नही चलेगी पद्मावत नही चलेगी’, ‘भन्साळी मुर्दाबाद’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी गंगापूर धरणाकडे धाव घेतली; परंतु अगोदरच प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कार्यकर्त्यांना धरणाच्या प्रवेशद्वारावरच ताब्यात घेण्यात आले.  तत्पूर्वी आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या देत संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला यापुढेही असाच विरोध सुरू ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट केले. राजपूत करणी सेनेचे राष्टÑीय महासचिव आनंदसिंग ठोके यांनी म्हटले की, जीवंतपणी पद्मावतीमातेचा असा अपमान होताना आम्ही बघू शकत नाही, त्यामुळे प्रशासनाने आम्हाला जलसमाधी घेण्याची परवानगी द्यावी. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यासर्व प्रकाराविषयी गंभीर नसल्याने याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये त्यांना भोगावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.  दरम्यान, तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढताना कुठल्याही प्रकारचे अनुचित कृत्य करू नये, अशी विनंती केली. यावेळी महाराणा प्रताप क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, महाराणा प्रताप युवा सेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष किशोर पवार ,करणसिंग देवरे, प्रदेश सचिव जितेंद्र सूर्यवंशी, नाना मोरखड, सचिन पवार, लखन पवार, सुरेखा राजपूत, वंदना राजपूत आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :cinemaसिनेमा