नांदगावी समर्थकांचा रास्ता रोको
By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:16+5:302016-08-18T23:34:16+5:30
आरोप : छगन भुजबळांसह कुटुंबीयांना संपविण्याचे षडयंत्र

नांदगावी समर्थकांचा रास्ता रोको
नांदगाव : न्यायालयात कोणताही गुन्हा अजून सिद्ध झाला नसताना छगन भुजबळ व कुटुंबीयांना संपविण्यासाठी सगळे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप करीत भुजबळ समर्थकांनी आज येथे सरकारच्या विरोधात रास्ता रोको केला.
माळी समाजापुरता हा मेळावा असू नये. भुजबळ सर्वांचेच अशी भूमिका काही समर्थकांनी व्यक्त केल्याने व्यासपीठावर कुणीही बसणार नाही. मंचावर लावलेल्या ध्वनिक्षेपकासमोर जायचे व विचार मांडायचे अशा मतप्रवाह दिसून आल्याने या मेळाव्यात तरु णांनी मोठी उपस्थिती लावली. छगन भुजबळ पंकज भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा केलेला विकास लक्षात घेता या मतदारसंघातून भुजबळ यांच्याप्रति विश्वास दाखविणारा मेळावा म्हणूनदेखील त्याकडे बघितले. माजी आमदार अनिल अहेर, नाशिकचे डॉक्टर कैलास कमोद, साहेबराव पाटील, नगराध्यक्ष शैलेजा गायकवाड, डॉ.वाय.पी. जाधव, धनंजय कमोदकर, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, भास्कर कदम, देवदत्त सोनवणे, यशवंत शिंदे, विजय पाटील, साहेबराव अहेर, शिवाजी पाटील, रमेश पगार, डॉक्टर सुरेश गायकवाड, इक्बाल शेख, सचिन मराठे, महेंद्र गायकवाड, राजेंद्र गायकवाड, बाळा गायकवाड आदिंच्या उपस्थितीत निषेध मेळाव्यात जोरकस निषेध व्यक्त केला. विष्णू निकम यांनी सूत्रसंचालन केले़
या मेळाव्याच्या सांगतेनंतर शहराच्या विविध मार्गाने मेळाव्याला उपस्थितीत हजारोच्या संख्येने भुजबळ समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करीत भव्य रॅली काढली. जुन्या तहसील कार्यालयाजवळील राज्य मार्गाच्या त्रिफुलीवर कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनावेळी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अरुण निकम यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले़ (वार्ताहर)