आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको

By Admin | Updated: August 13, 2014 00:38 IST2014-08-12T23:55:59+5:302014-08-13T00:38:47+5:30

आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको

Stop the way for reservation demand | आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको

आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको

येवला : वीरशैव लिंगायत समाजास ओबीसी व अल्पसंख्याक आरक्षण देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत राज्य व केंद्र शासनाच्या निषेधार्थ अंदरसूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे येवला-वैजापूर रस्त्यावर सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती.
महाराष्ट्रात ८० लाख वीरशैव लिंगायत समाज विखुरलेला आहे. समाजातील जाती पोटजाती या सामाजिक शैक्षणिक आरक्षणाअभावी मागासलेला राहिला आहे. चार दिवसांपासून कराड येथे समाजाचे नेते काका कोयटे, सुनील रुकारी यांच्यासह कार्यकर्ते बेमुदत उपोषणास बसले आहे. त्यांची प्रकृती ढासळली असतानादेखील शासन मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी येवला तालुक्यातील वीरशैव समाजाच्या कार्यकर्त्यांनी अंदरसूल येथे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता रास्ता रोको केला. आंदोलनात भारत धुमाळ, चंद्रकांत साबरे, प्रदीप गाढे, काशीनाथ धुमाळ, भगवान सुराडे, सुमित घोगाने यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the way for reservation demand