मालेगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By Admin | Updated: February 13, 2017 21:46 IST2017-02-13T21:46:45+5:302017-02-13T21:46:45+5:30

तालुक्यातील मुंगसे येथील कांदा खरेदी केंद्रावर व्यापाºयांनी आज काहीकाळ कांदा खरेदी बंद केल्यामुळे व कांद्याच्या

Stop the way for Malegaon farmers | मालेगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

मालेगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

ऑनलाइन लोकमत

मालेगाव (नाशिक), दि. 13 -  तालुक्यातील मुंगसे येथील कांदा खरेदी केंद्रावर व्यापाºयांनी आज काहीकाळ कांदा खरेदी बंद केल्यामुळे व कांद्याच्या कोसळलेल्या दराच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी  मुंबई - आग्रा महामार्गावर रस्तारोको आंदोलन केले होते. यामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलीस व बाजार समिती प्रशासनाने आंदोलनस्थळी धाव घेऊन शेतकºयांची समजूत काढली. तसेच दुपारुन लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्यामुळे शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले होते.
व्यापाऱ्यांना वॅगन उपलब्ध होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी  कांदा खरेदी केंद्रावर कांदा खरेदी काहीकाळ बंद केली होती. तसेच लिलाव प्रक्रियेत कांद्याला कमी भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. त्यातच कालपासून शेतकरी कांद्याने भरलेली वाहने घेऊन मुंगसे उपबाजार आवारात उभी होती; परंतु कांदा लिलावास सुरूवात झाली. त्यावेळी अत्यल्प अशा शंभर रूपयांपासून कांदा विक्रीस सुरूवात झाली. सुमारे ४५० रूपये क्विंटलपर्यंत दराने कांदा विक्री झाली. 
या प्रकाराच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई- आग्रा महामार्गावर जमा झाल्याने सुमारे अर्धातास रस्तारोको आंदोलन केले.  बाजार समितीचे सचिव अशोक देसले व तालुका पोलीसांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन शेतकºयांची समजुत काढली. दरम्यान, कांदा व्यापाऱ्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. राज्यमंत्री भुसे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी तात्काळ दूरध्वनीवरुन संपर्क साधला. रेल्वे मंत्र्यांनी कांदा वाहतूक सुरळीत करण्यासाठी वॅगन्स उपलब्ध करुन देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Stop the way for Malegaon farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.