मेशी - कोसळलेल्या कांदा भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मेशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. सध्या घसरलेले कांद्याचे भाव तसेच शासनाने दिलेले अनुदान यामुळे कांदा विक्र ीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ मेशी येथील शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. अर्ध्या तासाने देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजूळ व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली असता त्यांना शेतकºयांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यानंतर हळूहळू वाहतूक कोंडी मोकळी होऊन दळणवळण सुरळीत सुरू झाले. आंदोलनावेळी देवळा सौंदाणे रस्त्यावरील दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील अहेर, देवळा पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ, मेशी उपसरपंच भिका बोरसे ,ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाठ ,समाधान गरूड, उखा बच्छाव, बाबुलाल चव्हाण, सुनिल शिरसाठ ,तुषार शिरसाठ आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकºयांनी शासनाच्या धोरणावर जाहीर टिका केली.
कांदाप्रश्नी मेशीकरांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:32 IST