ओझर टाऊनशिप वसाहतीतील पथदीप बंद
By Admin | Updated: May 13, 2014 00:17 IST2014-05-13T00:17:13+5:302014-05-13T00:17:13+5:30
ओझर टाऊनशिप : येथील वसाहतीमध्ये पहिला बसस्टॉप ते धोबी टपरी परिसरातील मुख्य रस्त्यावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद असून ते त्वरित सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

ओझर टाऊनशिप वसाहतीतील पथदीप बंद
ओझर टाऊनशिप : येथील वसाहतीमध्ये पहिला बसस्टॉप ते धोबी टपरी परिसरातील मुख्य रस्त्यावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद असून ते त्वरित सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. पहिला बसस्टॉप ते धोबी टपरी या भागातील टाइप टू, टाइप ए, मॅच बॉक्स सेक्टर व टाइप थ्री क्वॉर्टरमध्ये शेकडो एच.ए.एल.कामगार व अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. या भागात असलेल्या मुख्य मार्गावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद आहेत. स्टेट बँक रस्ता, स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील रस्ता व धोबी टपरी ते टाइप फाइव्हपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील पथदीपाच्या जुन्या जोडण्या काढून त्या ठिकाणी लख्ख असा प्रकाश देणारे पथदीप लावण्यात आले असून, तेथे पथदीपाच्या जोडण्या बदलणे तर दूरच, आहे तेच बंद स्थितीत असल्याने रात्रीच्या वेळी या रस्त्याने जाणार्या येणार्या वाहनांना छोटे-मोठे अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून, यात अनेक जण जखमीसुद्धा झाले आहेत. पथदीप बंद असल्याने अंधारात पेट्रोल चोरीसह भुरट्या चोर्यांच्या प्रकारात वाढ झाली आहे. या प्रकारांनी त्रस्त झालेल्या, रहिवाशांनी या भागातील पथदीप त्वरित सुरू करावे, क्वॉर्टर रिन्हिवेशन (लाईटफिटिंग) करावे, अंडरग्राऊंड वायरिंग करावी, ज्यामुळे पथदीप बंद होणार नाही, अशी मागणी एच.ए.एल. इलेक्ट्रीक मेन्टेनन्स विभाग यांच्याकडे केली आहे.