शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेचे आज राज्यभर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 01:04 IST

ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषदेच्या वतीने आज, गुरुवारपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाबरोबरच जनगणनेसह विविध मागण्यांसाठी ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन आंदोलन केले जाणार असल्याचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देबैठकीत निर्णय: जनगणनेचीही आग्रही मागणी

नाशिक : ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषदेच्या वतीने आज, गुरुवारपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाबरोबरच जनगणनेसह विविध मागण्यांसाठी ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन आंदोलन केले जाणार असल्याचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक बुधवारी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करीत राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत खैरे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी समाजाचे नेते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहेत, तर समता परिषदेच्या वतीने रस्त्यावरची लढाई लढली जाणार आहे. राज्यातील सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन जिल्हा, शहर व तालुका पातळीवर रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकमध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसींच्या जागेवर लढणारे सर्व राजकीय नेते आंदोलनात सहभागी हेाणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी यावेळी दिली.

बैठकीस संतोष सोनपसारे, संतोष गायकवाड, समाधान जेजुरकर, अंबादास खैरे, कविता कर्डक, तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे, समाधान जाधव, अरुण काळे, बाळासाहेब जानमाळी, मंदाकिनी जाधव, आशा भंदुरे, अरुण नेवासकर, विजय राऊत, दिलीप तुपे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकOBC Reservationओबीसी आरक्षणagitationआंदोलन