राणे यांच्या निषेधार्थ सिन्नरला शिवसेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:18 IST2021-08-25T04:18:46+5:302021-08-25T04:18:46+5:30

सिन्नर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया सिन्नर तालुक्यात उमटल्या. संतप्त ...

Stop Shiv Sena's way to Sinnar to protest Rane | राणे यांच्या निषेधार्थ सिन्नरला शिवसेनेचा रास्ता रोको

राणे यांच्या निषेधार्थ सिन्नरला शिवसेनेचा रास्ता रोको

सिन्नर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया सिन्नर तालुक्यात उमटल्या. संतप्त शिवसैनिकांनी नाशिक-पुणे महामार्गावर बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शिवसेना नेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक सकाळी बसस्थानकासमोर जमा झाले. त्यांनी राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला. शिवसैनिकांनी हातात कोंबड्या आणून कोंबडी चोर म्हणून घोषणा दिल्या. सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले.

यावेळी शिवसेना युवा नेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक पंकज मोरे, शैलेश नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, संजय सानप, शिवसेना तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, किरण कोथमिरे, पिराजी पवार, प्रकाश पांगारकर आदी उपस्थित होते.

(२४ सिन्नर ३)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करताना उदय सांगळे, किरण डगळे, पंकज मोरे, शैलेश नाईक, संजय सानप, दीपक खुळे, सोमनाथ तुपे यांच्यासह शिवसैनिक.

240821\24nsk_28_24082021_13.jpg

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ सिन्नर तालुका शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करतांना उदय सांगळे, किरण डगळे, पंकज मोरे, शैलेश नाईक, संजय सानप, दीपक खुळे, सोमनाथ तुपे यांच्यासह शिवसैनिक. 

Web Title: Stop Shiv Sena's way to Sinnar to protest Rane