सीटूचा रास्ता रोको
By Admin | Updated: January 19, 2016 23:00 IST2016-01-19T22:26:09+5:302016-01-19T23:00:57+5:30
महामार्ग ठप्प : पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

सीटूचा रास्ता रोको
घोटी : केंद्र व राज्य शासनाच्या जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण या त्रिसूत्री धोरणाचा निषेध करीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी सीटू संघटनेच्या वतीने घोटीजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील टोलनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मांडल्याने महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत जेलभरो आंदोलनही केले. यावेळी पोलिसांनी सुमारे शंभराहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व सीटूचे देवीदास आडोळे, चंदू लाखे, कांतीलाल गरु ड यांनी केले.
मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र पवार यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात अप्पा भोले, सुनील मालुंजकर, विश्राम गवते, भाऊसाहेब जाधव, जनक लंगडे, सदाशिव डाके, हनुमान गतीर, रामदास चारोस्कर, रुं जा वाघ, शिवराम बांबळे, त्र्यंबक खाडे, बापू थिटे, जाईबाई घाटाळ, बबाबाई लहामगे, गोकुळ गोवर्धने, मोहन महाले, राजू झोले, भाऊ चंद्रे, एकनाथ लोंणे, निवृत्ती कडू आदिंचा समावेश होता. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह गणेश शेळके आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)