पाणीपुरवठा योजनेसाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 23:22 IST2016-02-14T23:07:36+5:302016-02-14T23:22:20+5:30

दिंडोरी : प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Stop the road for water supply scheme | पाणीपुरवठा योजनेसाठी रास्ता रोको

पाणीपुरवठा योजनेसाठी रास्ता रोको

दिंडोरी : शहरासाठीची प्रस्तावित रखडलेली ओझरखेड पाणीपुरवठा योजनेची जुनी देयके देत पाणीपुरवठा योजनेला गती मिळावी व योजना त्वरित पूर्ण करावी, या प्रमुख मागणीसाठी दिंडोरी नगरपंचायतीचे दिंडोरी विकास आघाडीचे नगरसेवक प्रमोद देशमुख यांच्यासह तुषार वाघमारे, सुनील भवर, सविता देशमुख, मालती जाधव, रोहिणी पगारे, निर्मला जाधव यांनी शनिवारी (दि. १३) दिंडोरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास सुरुवात केली. दरम्यान, शिवसेना-भाजपा पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको करत मागणीला पाठिंबा दिला. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी ठेकेदारांचे थकीत देयके तत्काळ देत योजनेच्या कामाला गती देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन व उपोषण मागे घेण्यात आले.
शिवसेनेचे गटनेते नगरसेवक प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सात विरोधी नगरसेवकांनी सुरू केलेल्या उपोषणास शिवसेनेचे नेते जयंत दिंडे, माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, कारभारी आहेर, सुरेश देशमुख, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती शोभा डोखळे, पं.स. उपसभापती छाया डोखळे, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत राजे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उत्तम जाधव, मनसेचे तालुकाप्रमुख सोमनाथ जाधव, सुरेश देशमुख, सुभाष देशमुख आदिंनी पाठिंबा दर्शवित उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपअभियंता व्ही. डी. पेठकर, शाखा अभियंता एस. बी. पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र चर्चेतून तोडगा निघत नसल्याने जि.प. चे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेत तहसील समोर नाशिक कळवण रोडवर सुमारे अर्धातास रास्ता रोको आंदोलन केले.

Web Title: Stop the road for water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.