शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
2
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
3
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
4
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
5
सोन्या-चांदीचा ऐतिहासिक भडका, एका दिवसात चांदी १४,१४३ रुपयांनी महागली; Gold मध्येही तेजी, पाहा नवे दर
6
"ट्रम्प यांच्या खाण्याच्या सवयी जणू विषच!" आरोग्य सचिवांचा धक्कादायक खुलासा, काय खातात?
7
IT कंपनीत ५ वर्षे काम, पण पगार वाढण्याऐवजी घटला! जावा डेव्हलपरची 'Reddit' पोस्ट व्हायरल
8
पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले
9
'बिनविरोध' निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा; हायकोर्टाने मनसेची याचिका फेटाळली
10
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
11
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
12
जीवघेणा शेवट! जिच्यावर प्रेम केलं, तिचे आधीच होते २ बॉयफ्रेंड; सत्य समजताच 'तो' हादरला अन्...
13
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
14
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
15
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
16
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
17
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
18
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
19
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
20
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 14:21 IST

विंचूर : कांद्याला हमीभाव द्यावा, द्राक्ष पिकाचा विम्यात समावेश करावा, सरसकट कर्जमाफी, शेतक-यांना वीजबील माफी द्यावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे विंचूर चौफुलीवर शनिवारी सकाळी १० वाजता सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

विंचूर : कांद्याला हमीभाव द्यावा, द्राक्ष पिकाचा विम्यात समावेश करावा, सरसकट कर्जमाफी, शेतक-यांना वीजबील माफी द्यावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी  कॉँग्रेसतर्फे विंचूर चौफुलीवर शनिवारी सकाळी १० वाजता सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर कांदे फेकत निषेध करण्यात आला. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुक काहीकाळ ठप्प झाली होती.येथील तीनपाटीवर कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले. सध्या शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून कांदा पिकाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून, कांद्याला हमीभाव द्यावा यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शेतक-यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. कांद्याला ५० ते १०० रु पये एवढी कवडीमोल किंमत मिळत असून त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. सरकारने त्वरित शेतमालाला हमीभाव द्यावा व संपूर्ण कर्जमाफी करून शेतकर्याचा सात बारा कोरा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार यांनी केली. दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी हतबल झाला असून खोटी आश्वासने देवून गेली पाच वर्ष भाजप ङ्क्त शिवसेना युती सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांना रडवले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शेतकरी बांधव भाजप शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही रविंद्र पगार यांनी दिला. यावेळी माजी आमदार धनराज महाले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, संजय बनकर, जिल्हा उपाध्यक्ष अरु ण मेढे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, निफाड तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, नगरसेवक देवदत्त कापसे, युवक अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र भवर, बबनराव शिंदे, पंचायत समतिीचे माजी सभापती प्रकाश वाघ, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल सालगुडे, शहराध्यक्ष मनोज धारराव, सचिन होळकर, रोहित धवण, सचिन दरेकर, पंचायत समिति सदस्य सुरेखा नागरे आदींची भाषणे झाली.

टॅग्स :Nashikनाशिक