शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आक्रोश आंदोलन ; आरक्षण वाचविण्यासाठी नाशकात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 16:47 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय्य मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने नाशिकच्या द्वारका चौकात गुरुवारी (दि. १७) आज तीव्र निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसमता परिषदेसह ओबीसी संघटनांचे आदोलननाशकातील द्वारका चौकात रास्ता रोकोपोलिसांकडून आंदोलकांना अटक करून सुटका

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय्य मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने नाशिकच्या द्वारका चौकात गुरुवारी (दि. १७) आज तीव्र निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे व कार्याध्यक्ष समाधान जेजूरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याने समता परिषदेसह सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने शुक्रवारी राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन करत राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. नाशिक शहरातील द्वारका चौकात जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र निदर्शने करत रास्ता रोको केला. यावेळी ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणना करण्यात यावी, यासह विविध न्याय्य मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. ओबीसींच्या मागण्यांबाबत सुरू केलेली ही आमची रस्त्यावरची लढाई ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहील, असे दिलीप खैरे यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्यासह विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजूरकर, नगरसेवक संतोष गायकवाड, समीना मेमन, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, तानाजी जायभावे, कविता कर्डक, रंजना पवार, सदाशिव माळी, समाधान जाधव, योगेश कमोद, अमर वझरे, ओबीसी संघटनांचे पदाधिकारी अंबादास खैरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

घोषणांनी परिसर दणाणलाओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे, ऊठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे, जय ज्योती जय क्रांती, ओबीसीचे राजकीय आरक्षण, हा आमचा हक्क आहे. हक्काचे आरक्षण आमची चळवळ, न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींचे पक्के आहे, ओबीसी आरक्षणाचा हक्काचा वाटा, केंद्र सरकार लवकर द्या इंपेरिकल डाटा, नही चलेगी नही चलेगी दादागिरी, नही चलेगी, ओबीसींच्या आरक्षणाला जाऊ देऊ नका तडा, ओबीसी आक्रोश आता देशव्यापी लढा... अशा घाेषणा देऊन संघटनांनी, आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकOBC Reservationओबीसी आरक्षण