नांदगाव-साकोरा रस्त्यावर रास्ता रोको
By Admin | Updated: June 6, 2017 02:20 IST2017-06-06T02:19:29+5:302017-06-06T02:20:27+5:30
पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत साकोरा : शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निषेध नोंदवून तब्बल तीन तास कडक उन्हात रास्ता रोको केला.

नांदगाव-साकोरा रस्त्यावर रास्ता रोको
नांदगाव-साकोरा रस्त्यावर रास्ता रोको लोकमत न्यूज नेटवर्क
साकोरा : नांदगाव-साकोरा रस्त्यावरील पुलावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी कर्जमाफी झालीच पाहिजे, पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे, भाजपा सरकार हाय हाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निषेध नोंदवून तब्बल तीन
तास कडक उन्हात रास्ता रोको केला.
राज्यभर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपास विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अगदी दुसऱ्याच दिवशी साकोऱ्यात भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
तरीही न्याय मिळत नसल्याचे चिन्ह दिसू लागल्याने शेतकऱ्यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपणच लढा दिला पाहिजे अशी जागृती एकमेकांमध्ये निर्माण करून सर्व शेतकरी एकजुटीने संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी पेन्शन योजना मिळावी, खते, बी-बियाणे व फवारणी औषधे सबसिडी दरात मिळावे, पिकांना हमीभाव मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी
आज सकाळी रस्त्यावर उतरला होता.
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, सरपंच वैशाली झोडगे, अमित पाटील, देवदत्त सोनवणे, दादा बोरसे, सतीश बोरसे, विलास बोरसे, सुरेश बोरसे, वसंत बोरसे, बबन सुरसे, हिंमत बोरसे, जन्याबाई चव्हाण, सुनीता पगार, अशोक बोरसे, प्रशांत बोरसे, बाळू बोरसे, बाबासाहेब बोरसे, संजय सुरसे, गणेश सुरसे, तात्या बोरसे, अमर सुरसे, भावराव सूर्यवंशी, लक्ष्मीकांत खैरनार, भाऊसाहेब काटकर, साळुबा काटकर, शिवाजी बोरसे, कैलास हिरे, गणेश भामरे, संदीप
पैठणकर, संजय वाघ, अनिल निकम, विजय बोरसे, राजेंद्र सुरसे आदी शेतकरी सहभागी झाले
होते.
रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी नांदगावचे तहसीलदार चंद्रकांत देवगुणे हजर झाले. त्यानंतर सर्व मागण्यांचे लेख्ीा निवेदन देण्यात आले व सर्व मागण्या शासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देऊन वाहतूक सुरळीत करून दिली.