शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी रास्ता रोको

By admin | Updated: November 17, 2016 23:59 IST

संताप : भाजीपाला लिलावावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

नांदगाव : भाजीपाला लिलाव गुरुवारी सकाळी बंद पडून रास्ता रोको करण्यात आला. तीन दिवस बाजार बंद होता. बंदची नोटीस नाही व सुरू करण्याची माहिती नाही. यामुळे विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी जैन धर्मशाळेजवळ पुलावर रास्ता रोको केला. तहसीलदार चंद्रकांत देवगुणे व पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व्यवहार सुरू झाले. देवगुणे यांनी बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी व अडते यांची बैठक शुक्रवारी (दि. १८) बोलावून सर्वांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.येथे पाच आडते असून, दररोज ५० हजारांपेक्षा अधिक उलाढाल होत असते. शेतकरी वर्गाकडून शून्य टक्के आडत व व्यापारी वर्गाकडून सात टक्के आडत घेण्याचा नियम असतानाही मनमानी करून अधिक रकमेची आडत घेतली जाते असा आक्षेप आहे. तसेच आडते व बाजार समिती यांच्यात पावती फाडण्यावरून वाद आहेत. दरम्यान, गेले आठ दिवस ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या वादावरून बंद असलेली बाजार समिती आज व्यापारी, शेतकरी व संचालक यांच्या बैठकीनंतर सुरू करण्याचे निश्चित झाले.खरेदीची रक्कम शंभर टक्के चेकने द्यावयाची, रोखीने व्यवहार करायचा नाही. चेक जर वटला नाही तर त्याच दिवशी धनादेशाची रक्कम रोखीने अदा करायची. असे न करणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना बाजार समिती रद्द करेल.ज्या व्यापाऱ्याकडे धनादेश नसेल त्याला लिलावात भाग घेता येणार नाही. शेतकऱ्याने लिलावात माल आणताना पासबुकची झेरॉक्स घेऊनच यायची जेणेकरून चेकवर अचूक नाव लिहिले जाईल. बैठकीस सभापती तेज कवडे, उपसभापती भाऊसाहेब सदगीर, भाऊसाहेब काकळीज, दिवटे, राजेंद्र देशमुख, व्यापारी सचिन पारख, संजय करवा, सोमनाथ घोंगाणे, समीर कासलीवाल, वाल्मीक गायके, चंद्रकांत फोफलिया, आनंद चोरडिया, सचिन फोफलिया, गोकुळ खैरनार उपस्थित होते.मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांकडून ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात जास्तीचा भाव देण्याचे आमिष दाखवून खरेदी करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. तसेच बाजार समिती बंद असण्याच्या कालावधीत अशा प्रकारे खरेदी केल्याचे समजते. सर्व रकमा धनादेशाने अदा करावयाच्या निर्णयामुळे सदर प्रकारास आळा बसेल असे समजण्यात येत आहे. (वार्ताहर)